Home अर्थ उद्यापासून महापालिकेची जप्ती मोहीम

उद्यापासून महापालिकेची जप्ती मोहीम


जळगाव ( प्रतिनिधी ) शहरातील नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरण्यासाठी देण्यात आलेली ३१ डिसेंबरची मुदत संपली असून ज्यांनी आपले कर भरले नसतील अशा नागरिकांना जप्तीचे वारंट बजावण्यात आले आहेत. तरीही अद्याप बऱ्याच मिळकत धारकांनी आपला कर भरला नसल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

या आदेशानुसार उद्यापासून (दि.८) शहरात वाजत-गाजत जप्तीची कारवाई सुरु केली जाणार आहे. तरी थकबाकीदार नागरिकांनी ही कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर आपला कर भरून सहकार्य करावे व जप्ती टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound