पिंप्री खुर्द ता.धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील लहान- मोठया गावात कोरोनाच्या वाढता ससंर्ग लक्षात घेता. आतापर्यंत सुरक्षित असलेल्या पिंप्रीत दोन दिवस कोरोनाच्या होणारा वाढता ससंर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे गावात नागरीकांच्या प्रत्येक्ष घरोघरी जावून आवश्यक ती आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
उद्या १० व ११ जुलै रोजी होणाऱ्या आरोग्य तपासणी मोहिमेत डॉक्टर्स व त्यांच्या सहकारी वृदांच्या वतीने गावातील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील तापमान व ऑक्सीजनची लेव्हल तपासणी करण्यात येणार आहे. यात सर्दी, ताप , खोकला, श्वसन विकारासह इतर व्याधीच्या त्रास व लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक योग्य त्या औंषधी उपचारासाठी नि:संकोचपणे आरोग्य विभागाच्या यंत्रणेस सहकार्य करणे आवश्यक आहे. आपले गाव व गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या दुष्टीने सुरक्षेतेसाठी गावातील लहान-मोठया मंडळीनी या दोन दिवसीय आरोग्य तपासणी मोहिमेत आरोग्य यंत्रणेस प्रामाणिकपणे आवश्यक ते सहकार्य करावे , असे आवाहन सरपंच तथा कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष, उपसरपंच..ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी, तलाठी , पोलीस पाटील यांच्यासह कोरोना नियंत्रण समितीच्या सदस्यांनी केले आहे.