Home राजकीय उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला ; जे.पी. नड्डांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला ; जे.पी. नड्डांचा गंभीर आरोप


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात आम्ही हरलो नाही. महाराष्ट्रात आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. सत्तेसाठी भाजपाचा विश्वासघात करण्यात आला. महाराष्ट्रात आम्ही निवडणूक जिंकलो होतो. फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच जनमताचा कौल होता. मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला असा गंभीर आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे.

 

‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने जे.पी. नड्डा यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना काँग्रेससोबत तुम्ही निवडणूक जिंकता, मात्र जे राज्यांमधले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जिंकताना कष्ट घ्यावे लागतात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तर आमच्यासोबतच निवडणूक लढले होते. महाराष्ट्रात आम्ही हरलो नाही. महाराष्ट्रात आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. सत्तेसाठी भाजपाचा विश्वासघात करण्यात आला. महाराष्ट्रात आम्ही निवडणूक जिंकलो होतो. फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच जनमताचा कौल होता. पण . मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला असा गंभीर आरोप नड्डा यांनी केला. दरम्यान, नड्डा यांच्या आरोपावर शिवसेना काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या आरोपावरून शिवसेना-भाजपात पुन्हा एकदा जुंपणार असल्याचे चित्र आहे.


Protected Content

Play sound