उत्तर प्रदेशात पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; स्मशानभूमीत मिळाला मृतदेह


हमीरपूर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्याच हमीरपूरमध्ये एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान,उत्तर प्रदेशातीलच अलीगडमधील तीन वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येची घटनेवर देशात संताप व्यक्त होत आहे.

 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीरपूर येथील कुरारा परिसरात एक कुटुंब गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीच्या कामासाठी कानपूरमध्ये राहतात. त्यामुळे पिडीत 11 वर्षांची मुलगी गेल्या दोन महिन्यांपासून घरात एकटीच रहात होती. शुक्रवारी रात्री काही गुंड घरात घुसले आणि मुलीला उचलून बाहेर नेत तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह गावाच्या स्मशानभुमीत फेकला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Add Comment

Protected Content