अमळनेर, प्रतिनिधी | येथील बळीराजा स्मारकामागील रहिवासी उत्कर्ष दत्तु चौधरी याची इंडियन नेव्ही फॉर एसएसआर या पदावर निवड करण्यात आली आहे.
प्रताप महाविद्यालयात एफ.वाय.बी.एसस्सी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेणारा विद्यार्थी उत्कर्ष दत्तु चौधरी याचे इंडियन नेव्ही फॉर एसएसआर या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तो सध्या ओरिसातील आयएनएस चिलखा येथे प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेत आहे. तो उन्नती कॉम्प्युटरचे संचालक दत्तु चौधरी व प्रताप महाविद्यालय संगणकशास्त्र विभागातील प्रा.तृप्ती चौधरी यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.