Home धर्म-समाज उड्डाण पूलाचे सर्वज्ञ चक्रधर स्वामी असे नामकरण करा ; ग्रामस्थांची मागणी

उड्डाण पूलाचे सर्वज्ञ चक्रधर स्वामी असे नामकरण करा ; ग्रामस्थांची मागणी

0
34

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील उड्डाण पुलास सर्वज्ञ चक्रधर स्वामी असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी कानाशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

कजगाव – गोंडगाव रेल्वे ट्रॅकवरील उड्डाणपूल हा कनाशी शिवारात आहे.  कनाशी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या उड्डाणपुलास सर्वज्ञ चक्रधर स्वामी असे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देते प्रसंगी वृंदावन हाॅस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील, सुनिल पाटील (वलवाडी), समाधान पाटील (वडजी), राजू पाटील (पांढरद), अशोक पाटील (वाक), मोहन पाटील (महिंदळे), अजय महाजन (पिंपरखेड), सुनील पाटील (अंतुर्ली), भोला पाटील (गोंडगाव), मयूर पाटील (कनाशी), दिनेश पाटील (सावदा), जगदीश पाटील (वडजी), सुनिल वंजारी (पडासखेडे), स्वरूप राजपूत (शिवनी), मोरसिंग राठोड (वडगाव नालबंदी), दिपक मोरे (पिंप्री हाट), रवींद्र चौधरी (मांडकी) सह ग्रामस्थ उपस्थित होते.


Protected Content

Play sound