जळगाव, प्रतिनिधी | नशिराबाद उड्डाण पूल,भुसावळ उड्डाण पूलचे काम अपूर्ण असताना टोल वसूल करण्यात येत असून तो त्वरित बंद करण्यात यावा अशी मागणी अल्पसंख्यांक सेवा संघटनेतर्फे न्हाईचे प्रकल्प संचालक सी. एन. सिन्हा यांना प्रदेशाध्यक्ष जहांगीर खान यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, नॅशनल हायवे क्र.६ तरसोद ते चिखली या मार्गाचे काम अपुर्ण आहे त्यामुळे एक ना एक अपघात होत आहे. नशिराबाद पुढील रेल्वे पुल, भुसावळ येथील रेल्वे पुल अद्याप ही अपुर्ण आहे. तरी देखील सामान्य नागरीकांकडून टोल वसुल करण्यात येत आहे. तसेच डिव्हाईडरचे कामे अपूर्ण आहे. रात्रीच्या वेळी अपघात होत आहे. फास्ट ट्रॅकच्या नावाखाली ही लुट होत आहे व कॅश काऊंटर नसल्यामुळे ही नागरीकांचे हाल होत आहे. अपूर्ण काम असल्यावर ही सदर टोल वर अनधिकृत टोल वसुली त्वरीत बंद करण्यात यावी व केलेली वसुली शासनाने जप्त करावी आणि टोल काँट्रॅक्ट रद्द करावा. अन्यथा अल्पसंख्यांक सेवा संघटनेतर्फे सदर टोलवर जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर उपाध्यक्ष याकुब खान, अपंग जिल्हा अध्यक्ष मुन्जीम खान, सहसचिव जाकीर भिस्ती आदीची स्वाक्षरी आहे.