मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उचंदे येथील युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूल व इन्फिनिटी कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम, बाल आनंद मेळावा व “द सीक्रेट ऑफ हायली रेपुटेड स्कूल” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी गावातील व परिसरातील सर्व ज्येष्ठ – श्रेष्ठ मंडळी, सर्व पक्षांचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. आत्माराम मासुळे सरांनी सांस्कृतिक कार्यक्रम व बाल आनंद मेळाव्याचं महत्व सांगत पालकांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांमधून संजय शेषराव पाटील यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून मासुळे सर व त्यांच्या टीमला खूप शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे सुनंदा विनोद पाटील यांनी पालकांमधून प्रतिनिधित्व करत शिक्षकांबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांमधून कु. सोनाली विजय मोसे व कु. उपासना रवींद्र पाटील या मुलींनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचे महत्व प्रस्थापित केले. प्रथमेश प्रमोद पाटील व प्रणव साहेबराव पाटील या चिमुकल्यांनी इंग्रजी मधून यशस्वीरित्या आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री मासुळे, शुभम कांडेलकर, राजू भिल, प्रतीक्षा संदीप चौधरी, शुभांगी कपले, प्रियंका पाटील व लाईव्ह ट्रेंड न्यूजचे पत्रकार पंकज कपले यांचे सर्वांचे योगदान लाभले.