यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील उंदावद येथील बसस्थानकाजवळ बस न थांबल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उंदावद गावासाठी दिवसातून दोन वेळा बस वेळेवर मिळावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.
तालुकातील उंटावद येथून महाविद्यालयीन शिक्षणासाठी जळगावात दररोज जाणाऱ्या १५ ते २० विद्यार्थी व विद्यार्थीनी डांभूर्णीपर्यंत पायी जाऊन व तेथून पुढे बसने प्रवास करत जळगावला जातात, कारण उंटावदला फक्त एकच बस येते व तीही अवेळी असल्याने महाविद्यालयातील व क्लासेस साठी जळगावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होत नाही, म्हणून विद्यार्थी २ कि.मी. पायी डांभुर्णी फाट्यावर जाऊन यावल आगाराच्या बसने यावल जळगाव असे प्रवास करतात.
१५ रोजी उंटावद येथील प्रतीक्षा महेश पाटील या विद्यार्थिनीचा एसवायबीकाँम या वर्गाचा गणिताचा पेपर १० वाजता असल्याने ती सकाळी ८ वाजता डांभुर्णी येथील उंटावद फाट्यावर उभी होती, मात्र त्यादरम्यान १०.३० वाजेपर्यंत दोन बसेस यावल आगाराच्या यावल-जळगाव अशा या मार्गाने गेल्या मात्र एकाही वाहनचालकाने विनवणी करून देखील येथे बसेस थांबवल्या नाहीत म्हणून या विद्यार्थ्यीनीला आपला गणितचा पेपर देता आला नाही. १०.१० मिनिटांनी आलेल्या एका बसच्या समोर विद्यार्थिनी व तिचे पालक रस्त्यावर उभे राहून बस थांबविली व विद्यार्थीनीला बसमध्ये बसविले. दरम्यान बस आगारांशी संपर्क साधून माहिती घेतली असता बस वेळेवर असल्याचे सांगण्यात आले. मात्र या मार्गावरून दोन बसेस असल्याने अन्य बस येत नाही. या दोनच बसेस आल्याने त्या देखील न थांबल्याने विद्यार्थिनीला परीक्षेस मुकावे लागले.
उंटावद येथुन जळगाव व यावलला जाण्यासाठी कोणतीही बस नाही व त्यामुळे उंटावदहून महाविद्यालईन शिक्षणासाठी जळगावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना डांभुर्णी ते जळगाव अशी मासीक पास काढावी लागते व उंटावदहुन २ कि.मी.पायी डांभुर्णीला जाऊन बसने प्रवास करावा लागतो.
म्हणून उंटावदहुन महाविद्यालयीन वेळेत दिवसातुन दोन वेळा का होईना जळगावला जाण्यासाठी बससेवा सुरू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनसह ग्रामस्थांनी केली आहे.
यावल एसटी आगाराला कायमस्वरूपी व्यवस्थापक नसल्याने आगाराचा कारभार हा गोंधळलेल्या अवस्थेत असुन, आगारातील अनेक बसेस ही नादुरूस्त असल्याने त्या बसेस कुठल्याही निकाणी बंद पडत असल्याने प्रवासांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असुन, यातच अनेक बसेस अनियमीत धावतांना दिसुन येत असल्याने यावल आगाराचा कुणी वाली आहे की नाही? असा प्रश्न प्रवासी बांधवांमध्ये उपस्थित करण्यात येत आहे. प्रवासांच्या गंभीर प्रश्नाकडे प्रवासी संघटना लक्ष देणार का ? अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.