जळगाव, प्रतिनिधी । इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या बी.ए.वर्गातील विद्यार्थिनी उंजीला नाज नफीस शेख हिने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात व महाविद्यालयात उर्दू विषयात प्रथम क्रमांक पटकवला. तिला सन २०१९-२०२० चे कांतीलाल कोठारी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
उंजिला नाज नफीस शेख हिने उर्दू विषयातील एकूण गुण (सीजीपीए ९.६३ ) ८४.२५ ٪ मिळवून विद्यापीठ व महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. तर एम. ए. उर्दू विषयाची विद्यार्थिनी सुमयया सलीम शाह हिने विद्यापीठात मेरिट लिस्ट ९१.३१ गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, सचिव एजाज मलिक साहेब , उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शाह आणि प्राचार्य डॉ. सय्यद शुजात अली यांच्या उपस्थितीत उन्जीला नाज नफीस शेख व सुमयया सलीम शाह यांना सुवर्णपदक आणि बीए , व एम ए. ची पदवी देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य इब्राहिम पंजारी आणि उर्दू विभागाचे प्रमुख प्राध्यापक कहेकशा अंजुम देखील उपस्थित होते. विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटी जळगावचे अध्यक्ष सर्व मान्यवर सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग यांनी ऊंजीला नाज नफीस शेख आणि सुमय्या सलीम शाह यांचे अभिनंदन केले.