मुंबई प्रतिनिधी । चित्रपट अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय निरिक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आज माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशा कोपीकरचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. तिला वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी तीचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, खासदार अमर साबळे, आमदार कॅप्टन तमिळ सेलव्हन हे उपस्थित होते.