ईडीच्या ऑफिस समोर लावला भाजप प्रदेश कार्यालयाचा बोर्ड !

 

मुंबई प्रतिनिधी । संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने समन्स बजावल्यानंतर आज संतप्त शिवसैनिकांनी ईडीच्या मुंबई येथील ऑफीस समोर भाजप प्रदेश कार्यालय असा बोर्ड लाऊन आपला निषेध व्यक्त केला आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावले. त्यानंतर याबाबत संजय राऊत पत्रकार परिषद घेत असताना मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयाबाहेर काही शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालयाचा बॅनर झळकवला आहे. त्यानंतर त्वरित पोलीस बॅनर उतरवण्यासाठी आले असता त्यांना त्या शिवसैनिकांनी बॅनर उतारवण्याबाबत कारवाई महापालिका करेल असे म्हणाले असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. मात्र, तरीदेखील पोलिसांनी हा बॅनर उतरवला आहे.

या बॅनर्सचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. शिवसैनिकांनी हा बॅनर लावल्याचे लक्षात आल्यानंतर काही पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहचले. मात्र तुम्हाला हा बॅनर काढता येणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा असं शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी नंतर हा बॅनर खाली उतरवला.

Protected Content