जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | इकरा शिक्षण संस्था व्दारा संचलित एच. जे. थीम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तर्फे ७ दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबीर दि. २२ ते २८ मार्च दरम्यान नशिराबाद येथील जि. प. उर्दू शाळा क्रमांक १ येथे आयोजित करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार हे होते. उदघाटन नशिराबाद येथील स्वातंत्र सैनिक यांच्या पत्नी दगुबाई लालसिंग पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आले.
विशेष श्रम संस्कार शिबीर कार्यक्रमात संस्थेच्या कार्यकारणीचे पदाधिकारी अमीन बादलीवाला , डॉ. ताहेर शेख , अजीज सालार, तसेच नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच पंकज महाजन, मुख्याध्यापक़ मसूद शेख , मुख्याध्यापक़ जहीर खान , समाजसेवक सैय्यद बरकत युसूफ अली , पंचायत समितिचे शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, गट शिक्षणाशिकारी फिरोज पठाण, केंद्र प्रमुख मुश्ताक शेख यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजू गवरे तर सूत्रसंचालन प्रो. डॉ. राजेश भामरे व आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. तनवीर खान यांनी मानले. अध्यक्षीय भाषणात डॉ. करीम सालार म्हटले की, राष्ट्रीय सेवा योजनाचे शिबिर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी उपयुक्त मंच आहे. तसेच शिबीर चारित्र्य निर्माण , समाजसेवा, राष्ट्रीयताचे संस्कार देणारी कार्यशाळा आहे. विद्यार्थ्यानी शिबिरातील प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. शिबिरात रोज श्रमदान , विविध विशेषज्ञ वक्त्यांचे पर्यावरण , जल संवर्धन , आरोग्य आदी विषयांवर बौद्धिक व्याख्यान , व आर्थिक ,सामाजिक सर्वेक्षण, विविध प्रार्थना स्थळाची साफ सफ़ाई असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. शिबिरात प्रभारी प्राचार्य प्रा. आय. एम. पिंजारी , उपप्राचार्य डॉ. वाय. ई. पटेल, प्रा. फरहान शेख उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीते करीता राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजू गवरे , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. तनवीर खान , महिला कार्यक्रम अधिकारी डॉ शबाना खाटीक, डॉ. राजेश भामरे , डॉ. चाँद खान , डॉ. आमीन काजी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रफ़ीक़ शेख यांनी कामकाज पहिले.