जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरातून ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरुन नेल्याप्रकरणी शनिवार, २० ऑगस्ट रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथे केशवकुमार भरतसिंग वय २४ हा तरुण वास्तव्यास आहे. १९ रोजी त्याने नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर त्याची (आर.जे.०५ एल.एस. ६९२२) या क्रमाकांची दुचाकी उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेतला असता, दुचाकी मिळून आली नाही. दुचाकी चोरीची खात्री झाल्यावर केशवकुमार भरतसिंग याने शनिवार शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे हे करीत आहेत.