यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मारूळ येथील एका मजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्याक्तीच्या उपचारासाठी आमदार शिरीष चौधरी यांच्या तत्परतेने वैद्यकीय मदत देवून वेळीच उपचार केल्याने गरीब व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारूळ तालुका यावल या गावातील रहिवासी सैय्यद खिलाफत अली यांना हृदय विकाराचा झटका आला. घरची परिस्थिती जेमतेम व अत्यंत गरिबीची सैय्यद खिलाफत हे घरातील कमविती व्यक्ती व त्यांनाच हृदय विकाराने ग्रासले. सैय्यद कुटुंबापुढे समस्याचा मोठा डोंगर उभा राहिला. घरातील कमावती व्यक्ती गमविणे हा विषय कुटुंबासाठी परवडणारा नव्हता व ती व्यक्ती गमविल्यानंतर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडणार. हे मात्र निश्चित होते. त्यामध्ये हातात पैसा नाही व त्यात जडला जीवघेणा आजार काय करावे काही समजत नव्हते.
वेळेत उपचार मिळावे यासाठी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. त्यानुसार आमदार शिरिष चौधरी यांनी सैय्यद खिलाफत अली यांच्या उपचारासाठी शासकीय यंत्रणा हालवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी १ लाखाचा निधी तात्काळ अधिक्षक श्री गजानन हार्ट हॉस्पिटल जळगांव यांच्या खात्यात जमा करण्यात आली. व सैय्यद खिलाफत अली यांच्या उपचारास गती प्राप्त झाली व उपचार यशस्वी पणे सुरू होऊन त्याचा जिव वाचला.
सैय्यदसाठी आमदार ठरले देवदूतच
सैय्यद खिलाफत अली यांच्यासाठी आमदार शिरिष चौधरी हे देवदूतच ठरल्याची गावात व परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधी मिळण्याकामी आवश्यक लागणारी कागदपत्रक मारुळ गावचे तरुण सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद अहमद यांची फार मोठी मदत मिळाली व त्यामुळे सैय्यद खिलाफत अली यांचा यशस्वी उपचार मदत होऊन त्यांचा जिव वाचला व सैय्यद कुटुंबातील कमविती व्यक्ती ही आधार म्हणून आज कुटुंबा समवेत उभी आहे व सैय्यद कुटुंबामध्ये एक आनंदाचे वातावरण असुन संपूर्ण सैय्यद कुटुंब आमदार शिरिष चौधरी, सैय्यद जावेद अहमद व सरपंच सैय्यद असद अहमद यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे आमच्या हक्काची व्यक्ती आज आमच्या सोबत असल्याची भावना व्यक्त करुन अनेक आशिर्वादाची देऊन समाधान व्यक्त करित आहे.