आ. चव्हाण यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

 

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील कोरोना बांधीत रूग्णांची  रेमडीसीव्हर  व आॅक्सीजन यांच्या अभावामुळे गैरसोय होत असून अनेक रूग्ण हे दगावत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार  दि. २० एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने  जिल्हाध्यक्ष राजू भोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

 

या बैठकीला चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण हेही उपस्थित होते.  बैठकीत त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तालुक्याला मागणीच्या कमी प्रमाणात रेमडीसीव्हर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे तालुक्याला जास्तीतजास्त रेमडीसिविर व ऑक्सिजन पुरवठा व्हावा अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली.

रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक विकास निधीतून आ. चव्हाण यांनी दिलेल्या २४ लाखांची अत्याधुनिक रुग्णवाहिका ही  चालकच नसल्याने धूळखात पडून आहे. तसेच पीएम केअर फंड मधील ५ व्हेंटिलेटर आ. चव्हाण यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता कार्यान्वित करण्यात आले असल्याचे आ. चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर उपलब्ध असणारे व्हेंटिलेटर हाताळण्यासाठी १ टेक्निशियन व रुग्णांच्या सोयीसाठी अजून अतिरिक्त १ ANM, ३ वार्डबॉय नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक व वरिष्ठ अधिकारी यांनी दर आठवड्याला शहरासह ग्रामीण भागातील कोविड सेंटर्सला सरप्राइज व्हिजिट दिल्यास त्यांना तेथील अडचणी कळायला मदत होतील असे निदर्शनास आणून दिले. त्यावर लागलीच जिल्हाधिकारी यांनी अश्या व्हिजिट साठी वेळापत्रक बनविण्याचे आदेश दिले.

 

Protected Content