आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रीमती जी. जी. खडसे  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने  माजी मंत्री तथा आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या  शिबिराचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन उपस्थित होते.

 

आ. एकनाथ खडसे यांच्या उद्या २ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अॅड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी,  आपल्या रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचणार आहे. कदाचित त्या व्यक्तीचा तो पुनर्जन्म असेल त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपण रक्तदानाचा वसा उचलू या आणि ना़थाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ या असे भावनिक आवाहन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य  महाजन यांनी   आ. एकनाथराव खडसे यांच्या  वाढदिवसानिमित्ताने आपल्याला हजारो लोकांचे प्राण वाचवण्याची संधी या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मिळत आहे.  म्हणून प्रत्येकाने किमान वर्षातून एकदा तरी रक्तदान करून ‘रक्तदाता’ बनावे’ असे आवाहन केले.

या रक्तदान शिबिराचे संपूर्ण संयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे जळगावचे अध्यक्ष विनोद बियाणी, उपाध्यक्ष गनि मेमन तसेच पीआरओ वर्मा मॅडम, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.नारायण चौधरी, सचिव मा.डॉ. सी.एस.चौधरी, तसेच सन्माननीय संचालक मंडळ, महाविद्यालयाचे  उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे, ग्रंथालय अधीक्षक प्रा. सरोदे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला अधिकारी प्रा. डॉ. ताहीरा मीर यांनी केले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी निवृत्ती पाटील, प्रदीप साळुंखे, पांडुरंग नाफडे व जितेंद्र पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या शिबिरात सुमारे ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाचा पहिला मान ऋत्विक बढे या विद्यार्थ्यास मिळाला, त्याबद्दल अॅड. रोहिणीताईच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या रक्तदान शिबिरामध्ये उस्फूर्तपणे रोशन गायकवाड,आयर्न शिरतुरे, विवेक श्रावगे, महेश भोईटे  रोहित काळे, देवेंद्र धांडे, पवन चौधरी, चिन्मय महाजन, गौरव कोळी, कुणाल भारंबे, निर्मल पाटील, प्रमोद जावळे, अक्षय रुले, अजय तायडे, रितेश काळे, तुषार चौधरी, पियुष बडोगे, आदेश नरपळे, प्रणव बढे आणि महाविद्यालयातील क्रीडा संचालिका प्रा.डॉ.प्रतिभा ढाके इत्यादी विद्यार्थिनी व नागरिकांनी  रक्तदान केले.

शिबिर  यशस्वीतेसाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. अरविंद चौधरी, लॅबटेक्निक सीमा शिंदे, सुनील पावरा व मंगेश ओतारी,  कृष्णा कोळी, उदय कोळी, शितल भोई, भाग्यश्री जयकर, शुभम गायकवाड, प्रफुल यमनेरे,  ज्ञानेश्वर पाटील, वैष्णवी सुरवाडे, सपना बोदडे,  निखिल रायपुरे व ऋषिकेश वानखेडे आदी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कामकाज पाहिलं. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय डांगे तर आभार एनएसएस सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांनी मानले.  या शिबिराच्या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग तसेच मुक्ताईनगर तालुका व पंचक्रोशीतील तमाम माजी विद्यार्थी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Protected Content