जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात एस.एस.सी. परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थाध्यक्ष विलासराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.
आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात एस.एस.सी. परीक्षेत प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवार दि. १९ जुलै करण्यात आला. यात प्रथम क्रमांक प्राप्त दीक्षा नारखेडे व कल्याणी पाटील यांना ९१.६० गुण मिळाले, जागृती चिरमाडे ८७.८० गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर गुणवंती पाटील ८५.६० गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक मिळवला. आकांक्षा पाटील हिस ८५ टक्के मिळाले तर अस्मिता चौधरी ८४.६० गुण मिळवून अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला. सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलासराव चौधरी, चेअरमन उद्धवराव पाटील, सचिव कमलाकर सावदेकर व कार्यकारणी संचालक किशोर चौधरी, दुर्गादास भोळे, सुनील चौधरी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संचालक गोपाळ भोळे, दिलीप महाजन, पंडित चौधरी, मुख्याध्यापिका विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. के. राणे राजपूत यांनी केले.