जळगाव प्रतिनिधी – कोरोना बाधीतांसाठी मदत करणार्यांच्या संख्येत वाढ होत असून आज सतखेडा येथील आश्रमशाळेच्या कर्मचार्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक दिवसाचे वेतन देऊन आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. याला जळगाव जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे. या अनुषंगाने राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सतखेडा ता. धरणगाव येथील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी कोविड – १९ मध्ये प्रदादन केले आहे. यात प्राथमिक विभागाने ३६०२३ तर माध्यमिक विभागाने ३६४४४ असे एकूण ७३४५७ रूपये देणगी म्हणून दिले.
आज संबंधीत रकमेचा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे सोपवितांना सतखेडा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तथा स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील उपशिक्षक योगेश पाटील आदी उपस्थित होते.