चोपड़ा, प्रतिनिधी । येथील आर्किड इंटरनॅशनल स्कूलतर्फे ऑनलाइन हरित सप्ताह साजरा करण्यात आला. यात इयत्ता १ ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनातर्फे लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. यामुळे सर्व शाळा कॉलेजमध्ये ऑनलाइन क्लास सुरु आहेत. आर्किड इंटरनेशनल स्कूलतर्फे ही ऑनलाइन क्लासची सेवा १५ जून २०२० पासून चालू आहे. पालक आणि विद्यार्थी यांचा उस्फूर्त साथ मिळत आहे. यातच आर्किड इंटरनॅशनल स्कूल ,चोपडा तर्फे दिनांक १ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह ‘हरीत सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात आला. सदर सप्ताहात प्रि-प्रायमरी व प्रायमरीच्या इ.१ली ते इ.४थी च्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन घरुनच वृक्ष लागवड , निसर्ग चित्र रेखाटून रंग भरणे, हरीत सप्ताह वर भाषण देणे, प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कागदी पिशवी बनविणे अशा विविध प्रकल्प करुन त्याची छायाचित्रे ,व्हिडिओ फित ऑनलाईन पाठवून ऑनलाईन हरीत सप्ताह साजरा करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम व व्दितिय क्रमांक काढण्यात आले. यात संस्थेचे अध्यक्ष राहूल पाटील व डॉ. तृप्ती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच शिक्षकांनीही मेहनत घेतली.