‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ हे पाळत ठेवणारे ॲप; फ्रेंच हॅकरचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। करोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कॉनटॅक्ट ट्रेसिंगच्या नावाखाली हे अ‍ॅप लोकांचे जीपीएस लोकेशन सरकारच्या मालकीच्या सर्व्हरवर पाठवत असून हे अ‍ॅप म्हणजे पाळत ठेवणारे अ‍ॅप आहे, असा खळबळजनक दावा फ्रान्समधील प्रसिद्ध एथिकल हॅकर इलियट ॲडरसनने केला आहे.

इलियटने ५ मे रोजी आरोग्य सेतूसंदर्भात शंका उपस्थित केली होती. आधारकार्ड अ‍ॅपच्या सुरक्षेसंदर्भात माहिती उघड केली होती. त्याने आता आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये त्याने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना टॅग करत ते या अ‍ॅपबद्दल बरोबर होते असंही म्हटलंय. “हाय, आरोग्य सेतू, तुमच्या अ‍ॅपमध्ये सुरक्षेसंदर्भातील अडचण दिसून आली आहे. ९ कोटी भारतीयांची खासगी माहिती उघड होण्याचा धोका आहे. तुम्ही मला पर्सनल मेसेजवर संपर्क करु शका का? महत्वाची नोंद राहुल गांधी बरोबर होते,” असे ट्विट इलियटने मंगळवारी (५ मे रोजी) केले होते.

या ट्विटनंतर तासाभरातच भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती इलियटने दिली. इलियटने ९ कोटी भारतीयांच्या आरोग्यासंदर्भातील माहिती अशी उपलब्ध करुन देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केलं आहे. “माझ्याकडे खूप कमी संयम आहे. मी एका ठराविक काळानंतर या अ‍ॅपवरील खासगी माहिती उघड करणार आहे,” असा इशाराच इलियटने दिला होता. मात्र बुधवारी (६ मे रोजी) सरकारने यासंदर्भात स्पष्टीकरण देत “या अ‍ॅपवरील माहितीची चोरी किंवा सुरक्षेसंदर्भात कोणताही गोंधळ झालेला नाहीय. तसेच या हॅकर्सने या अ‍ॅपवरुन खासगी माहिती उघड होत असल्याचे सिद्ध केलेले नाही,” असे ट्विट केले.

Protected Content