आरोग्य तपासणी मोहिमेत युवाशक्ती फाऊंडेशन, शिवसेना महानगरचा पुढाकार

जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शहरात ७ दिवसांच्या लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात युवाशक्ती फाऊंडेशन, शिवसेना जळगाव महानगरचे कार्यकर्ते प्रशासनाच्या सोबत नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत.

लॉकडाऊनच्या ७ दिवसाच्या कालावधीत संपूर्ण जळगाव शहरात महापालिकातर्फे शहरातील नागरिकांचे घरो घरी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज ही आरोग्य तपासणी युवाशक्ती फाऊंडेशन, शिवसेना जळगाव महानगर व महापालिकेतर्फे शहरातील गणेशवाडी, तुकाराम वाडी , जानकीनगर, मंजुषा हौसिंग सोसायटी, मुक्तांगण हॉल तसेच नेरी नाका परिसरात करण्यात येत आहे. याला नागरिक यास चांगला प्रतिसाद देत आहेत.यावेळी व्हॅली स्पाईसचा का आयुष्य काढा सुद्धा देण्यात येत आहे.

Protected Content