आरपीआयची ‘जय भीम’ हा चित्रपट कर मुक्त करण्याची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | ‘जय भीम’ हा चित्रपट शासनाने कर मुक्त करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट)चे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

निवेदनाचा आशय असा की, दलितांच्या अन्यायाला वाचा फोडणारा व सत्य घटनेवर आधारीत “जय भीम” चित्रपटास राज्य शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात कर मुक्त करावा, जेणे करून “जय भीम” चित्रपट हा सर्वसामान्य गोर गरीब जनतेला कमी दरात राहीला तर तो पाहता येईल व त्याद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांची माहिती मिळेल. त्यामुळे राज्य शासनाने “जय भीम” चित्रपट हा कर मुक्त करून सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) जळगावच्या वतीने जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात येत आहे. याप्रसंगी महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, महानगर युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, महानगर उपाध्यक्ष नरेंद्र मोरे, महानगर संघटक किरण अडकमोल, महानगर कामगार अध्यक्ष अनिल लोंढे आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1046577046163994

 

Protected Content