नवी दिल्ली: वृत्तसंस्था । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता . मी आरएसएसला संघ परिवार म्हणणार नाही. कारण संघात महिलांचा आणि बुजुर्गांचा सन्मान होत नाही, असं म्हटलं आहे.
राहुल यांनी थेट संघाच्या कार्यप्रणालीवरच बोट ठेवल्याने त्यावर टीकेची झोड उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून हा निशाणा साधला आहे. मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित संघटनांना परिवार म्हणणे योग्य नाही. कुटुंबात महिला असतात. बुजुर्गांचा सन्मान होतो. करुणा आणि स्नेहाची भावना असते. संघात नेमकी त्याचीच वाणवा आहे. त्यामुळे आता मी संघाला संघ परिवार म्हणणार नाही, असं राहुल यांनी म्हटलं आहे. यापूर्वी राहुल यांनी संघाशी संबंधित शाळांची पाकिस्तानच्या कट्टर इस्लामिक मदरशांशी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचं वादळ उठलं होतं.
यापूर्वी राहुल गांधी यांनी संघाच्या शाळांवरूनही संघावर टीका केली होती. संघाने त्यांच्या शाळेच्या माध्यमातून हल्ला सुरू केला आहे. पाकिस्तानमधील कट्टरपंथी इस्लामवादी मदरशांचा जसा वापर करतात तसाच संघाने सुरू केला आहे. आपल्या शाळा खूप वेगळ्या असल्याचं संघ भासवत असतो. पण या शाळांसाठी पैसा येतो कुठून हे कोणीच विचारत नाही. आर्थिक लाभ उठवणाऱ्या या शाळा नाहीत, त्यामुळे कोणीच हा प्रश्न विचारत नाहीत, असा टोला राहुल यांनी लगावला होता.
राहुल यांनी बिहार विधानसभेतील हाणामारीवरही भाष्य केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजप आणि संघमय झाले आहेत. लोकशाहीचं वस्त्रहरण करणाऱ्यांना सरकार म्हणण्याचा काहीच अधिकार नाही. मात्र तरीही विरोधी पक्ष जनहितासाठी आवाज उठवतच राहिल. आम्ही घाबरत नाही, असं सांगतानाच हुकूमशाहीचा विजय आहे, लोकशाहीचा परायज आहे, हा नितीश कुमार यांचा बिहार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला