जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |महापालिकेच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्लास्टिक बंदी अधिनियमाचे उल्लंघन करणारे निर्माते ,वितरक व किरकोळ विक्री करणारे विक्रेते यांच्याकडून जवळपास ९० किलोचे प्लास्टिक जप्त करून १६ हजार १८० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
आयुक्त विद्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, आरोग्य विभागाचे आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक यु. आर. इंगळे यांचे समवेत आरोग्य विभाग युनिट प्रमुख वार्ड मुकादम कर्मचारीवर्ग आदींनी शहरातील विविध भागात प्लास्टिक जप्तीची कारवाई केली. यात मास्टर कॉलनी कसाईवाडा या ठिकाणी प्लास्टिक जप्ती करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच महाबळ परिसरातील भाजीपाला मार्केट, भगवती स्वीट मार्ट ,शिव डेअरी , मेहरुण परिसरातील अशोक किराणा परिसर , कृषी उत्पन्न भाजी मार्केट येथे प्लास्टिक जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दिवसभराच्या कारवाईत जवळपास ९० किलो प्लास्टिक जप्त करून १६ हजार १८९ रुपयांचा दंड आकारण्यात आला. आयुक्त विद्या गायकवाड यांनी शहरातील सर्व नागरिकांना व व्यावसायिकांना प्लॅस्टिक ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन केले आहे. प्लॅस्टिक बंदी अधिनियमाचे उल्लंघन करणारे निर्माते, वितरक व किरकोळ विक्री करणारे विक्रेते यांच्यावर मनपाची कारवाई सतत सुरू राहील याची नोंद घ्यावी असे मनपा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. यावेळी आयुक्त विद्या गायकवाड यांनी नगरसेवक बंटी जोशी यांच्या प्रभाग क्र. १२ मधील नाली व रस्त्यांची पाहणी केली.