यावल, प्रतिनिधी ।येथील नगर परिषदेच्या वतीने विस्तारित कार्यक्षेत्रात नवीन वसाहतीत बांधकाम केले असून याठिकाणी जागोजागी मातीचे ढिगारे पडून असल्याने या ढिगाऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने सर्वत्र चिखल तयार झाल्याने नागरिकांना येथून मार्गक्रमण करतांना अडचणींचा सामना करावा लगत असून या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी अशी मागणी आयशानगरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
नवीन वसाहतीमध्ये काही दिवसापुर्वी नगरपतिषदेच्या माध्यमातुन नागरीकांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून गटारींचे बांधकाम करण्यात आलीत मात्र गटारीचे कामपुर्ण झाल्यावर त्या ठीकाणी रस्त्यावर जागोजागी मातीचे ढीगार पडले असुन या मातीवर पावसाचे पाणी पडल्याने चिखल निर्माण झाले असुन सर्वत्र घाणीचे साम्रराज्य पसरले आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारक पादचारी आणी रहीवासी नागरीकांना मोठया त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . या संदर्भात या विस्तारीत परिसरातील आयशानगर या लोकवस्ती मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी या नागरी समस्या सोडविण्या संदर्भात मुख्याधिकारी यांना आपल्या स्वाक्षरीचे निवेदन नगर परिषदचे बांधकाम अभियंता योगेश मदने यांना दिले आहे. या निवेदनावर अशपाकशाह गफ्फारशाह , शेख सुलेमान शेख लुकमान , नाजीम शेख निजामोद्दीन, शेख जुनेद शेख वाहेद , शेख जुनेद शेख नासीर , शेख सलीमोदीन यांच्यासह आदींच्या या निवेदनावर स्वाक्षरी असुन , नगर परिषदेने तात्काळ ही समस्या सोडवावी अशी अपेक्षा परिसरातील नागरीक् करीत आहे.