आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाल्याने सामान्य संतापले

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अनेकांनी एकाच वेळी यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट दिल्याने साईट क्रॅश झाली आहे. अनेकांनी यासंदर्भात ट्विटरवर तक्रार केलीय.

 

पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच अद्याप पॅन आणि आधार लिंक न केलेल्यांच्या आयकर विभागाच्या साईटवर उड्या पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  ३१ मार्च २०२१ आधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीत तर पॅन कार्ड वापरासंदर्भातील काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सरकारने यासाठी ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत दिली आहे.

 

 

पॅन आणि आधार लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्व्हरमध्ये अडचण असल्याचं, साईट सुरु होऊ शकत नाही असे संदेश स्क्रीनवर दिसत आहेत. अनेकांनी यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर करत आता साईटच बंद असल्यावर आम्ही हे काम आजच्या आज कसं करायचं असा प्रश्न सरकारी यंत्रणांना विचारला आहे. आयकर विभागाच्या ट्विटर हॅण्डलसोबतच अनेकांनी युआयडी म्हणजेच आधारच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुनही हे प्रश्न विचारलेत.

 

अनेकांनी तर दोन्ही माहिती जर सरकारकडे आहे तर त्यांनी त्या लिंक करुन घ्याव्यात, सर्वसामान्यांना का वेठीस धरलं जात आहे असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी आयकर विभागाची साईट कधीच सुरु नसते अशी तक्रार ट्विटरवरुन केलीय. या तक्रारींमुळेच PANcard आणि Aadhaar हे दोन विषय टॉप ट्रेण्डमध्ये आलेत.

 

दरम्यान हा गोंधळ पाहता अनेकांनी आज असणारी शेवटची तारीख पुन्हा वाढवून दिली जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. मात्र ही बातमी देईपर्यंत डेडलाइन वाढवण्यासंदर्भात कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता.

Protected Content