आयएमआरमध्ये न्यूयार्क येथील उर्मिला पशीने यांचे व्याख्यान

जळगाव, प्रतिनिधी । केसीईज आयएमआरमध्ये उर्मिला पशीने यांचे “करीयर मीथबस्टरस” या विषयावर व्याख्यान इंटरनॅशनल कनेक्ट सेल अंतर्गत झाले. डॉ वर्षा पाठक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 

उर्मिला पशीने या आयएमआरच्या माजी विद्यार्थ्यांनी असल्याने त्यांनी आपला करीयर प्रवास उलगडताना आयएमआर ते दिल्ली, कॅलीफोर्निया ते न्यूयॉर्क असा आपला करीयर ग्राफ विद्यार्थ्यांंना उलगडून दाखवला. जळगावात काॅम्प्यूटर शिक्षण झाले तरी, अमेरिकेत अनेक नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यात मॅकडोनाल्ड डगलस ही विमान कंपनी,  सॅन ऑन ऑफरे हे अणु वीज केंद्र,गॅप ही फॅशन कंपनी, जग्वार लॅन्ड रोव्हर,यांचा समावेश आहे.

त्यांनी, इंटरव्ह्यू घेणारा, या जागतिकीकराच्या युगात,नेट युगात फ्रेशर्स कडुन काय अपेक्षा ठेवतो, इंटरव्ह्यू देणाऱ्याने सुध्दा कोणत्या गोष्टींचे भान बाळगायला हवे, हे आपलेच इंटरव्ह्यू घेण्याचे आणि देण्याचे अनुभव विद्यार्थ्यांबरोबर शेअर करीत, यशस्वतेची मानसिकता (ग्रोथ माईंडसेट) याकडे लक्ष वेधले. काम करताना तुमच्या विषयांतील हुषारीच्या बरोबरीनेच तुमचा भावनांक (इमोशनल इंटेलिजन्स), तुमची सूस्पष्ट विचार पध्दती, तुमची चिकाटी (ग्रिट), महत्वाची  ठरते . सर्व प्रथम महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर  इंटरव्ह्यूला सामोरे जातांना तुमच्या माहिती आणि ज्ञानाच्या बरोबरीनेच उत्तम शारीरिक आणि मानसिक स्थितीचा समतोल राखणे आवश्यक आहे. गुगलच्या सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला या  सी ई ओं च्या व्यक्तिमत्त्वाचे उदाहरण दिले. सरतेशेवटी त्यांनी सांगितले”

,Luck is what happens when prepration meets opportunity.  रोमन तत्त्ववेत्ता सेनेकाचे कोट सांगताना त्या  म्हणाल्या , “संधी हि तयारीच्या बरोबरीनेच येत असते. तेव्हा नशिबही उघडते, आणि नक्की चांगले घडते.” त्यामुळे लक्षात ठेवा, बरेच लोक सहमत आहेत की नशीब काही प्रमाणात संधी निर्माण करते-एक संधी , जी नोकरीची मुलाखत असू शकते आणि वेगवान ट्रॅकवर केलेल्या पदोन्नतीचा मार्ग समोर असतो- त्यासाठी सर्व दॄष्टीने सक्षम रहा असे त्यांनी समारोप करतांना सांगितले. याप्रसंगी एमसीए, बीबीए आणि बीबीएमचे विद्यार्थी उपस्थित होते. आभार डायरेक्टर प्रा, डॉ शिल्पा बेंडाळे यांनी मानले.

 

Protected Content