Home आरोग्य आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे निधन

आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे निधन


पुणे:वृत्तसंस्था । त्रिपुरा केडरचे व मूळचे नांदेड येथील आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे आज पुण्यात निधन झाले. अवघे ३४ वर्षे वय असलेले शिंदे नुकतेच त्रिपुराहून नांदेड येथे १५ दिवसांच्या सुट्टीवर आले होते.

त्रास होऊ लागल्याने प्रथम त्यांच्यावर नांदेड येथे तसेच नंतर औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुण्यात आणले गेले होते. कोरोना सदृष्य लक्षणे असल्याने त्यांची दोन वेळा चाचणी करण्यात आली होती मात्र दोन्ही वेळा अहवाल निगेटिव्ह आले होते. शिंदे यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलगा व परिवार आहे. पुणे प्रशासनाने शिंदे यांच्या मृतदेहावर पुण्यातच अत्यसंस्कार करण्याची सूचना केली आहे.


Protected Content

Play sound