जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सामाजिक कार्यकर्ते व आम आदमी पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते रईस खान यांची आम आदमी पार्टी युवा आघाडी जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती झाली असून या निवडीचे पत्र संदीप सोनवणे (राज्य संघटनमंत्री) यांच्या नेतृत्वाखाली सावन राऊत ( सचिव – आप युवा आघाडी महाराष्ट्र ) व महेश स्वामी ( सहसचिव – आप युवा आघाडी महाराष्ट्र ) यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
रईस खान हे मूळ चोपडा येथील असून प्रसिद्ध व्यवसायिक असून जळगाव कोर्ट समोर चहापाणी नावाने त्यांचे फर्म आहे.चोपडा तालुक्यांत त्यांनी आम आदमी पार्टीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याच्या वेलू आता जिल्हा नव्हे तर राज्यभर बहरत आहे.
रईस खान यांचे संघटन कौशल्य चोपडा शहर , जळगाव शहरसह संपुर्ण महाराष्ट्रात मजबूत असून याचा आम आदमी पार्टी युवा आघाडीला मोठा फायदा होईल, असा विश्वास सावन राऊत व महेश स्वामी यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीनंतर बोलताना रईस खान म्हणाले की, येणाऱ्या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून दिवसातील किमान अर्धा वेळ जनतेची सेवा करण्यासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देणार आहे. गरजूंना मदत करणे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या निवडी बद्दल तुषार निकम ( जिल्हा संयोजक ), विठ्ठलराव साळुंखे ( जिल्हा उपसंयोजक ) , प्रा. गणेश पवार ( जिल्हा उपसंयोजक ) डॉ महेश पवार ( जिल्हा सचिव ) ,डॉ. सुनिल गाजरे, योगेश भोई, योगेश हिवरकर, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी अभिनंदन केले आहे.