आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही : फडणवीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतची भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास त्यांनाही महाराष्ट्रातली परिस्थिती सांगणार आहे,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

 

फडणवीस पुढे म्हणाले शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली. अंतर्विरोधाचे हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी नियुक्ती झालेली नाही. देशात काय चालते, राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे, असेही ते म्हणाले. जाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या, असा टोला ‘महाजॉब्स’ पोर्टलवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उडालेल्या वादावरून फडणवीसांनी लगावला. अमित शहांची यांची भेट घेतली, त्यावेळी आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते.

Protected Content