यावल : प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात आज आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले .
यावल तहसीलदार कार्यालयात आज तालुक्यातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबप्रमुख मयत झालेल्या कुटुंबास प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले १६ कुटुंबातील वारसांना ३ लाख २० हजार रुपयांचे धनादेश आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते व तहसीलदार महेश पवार , नायब तहसीलदार आर . डी . पाटील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे , यावल पंचायत समितीचे गटनेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील , कॉग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .
या योजनेअंतर्गत पुष्पा कोल्हे ( रा . फैजपुर ), मनिषा कोळी ( रा – हंबर्डी ) , विमल भोई ( रा फैजपुर) , संगीता मंडवाले ( रा . फैजपु ) , मंगला तायडे ( रा . हंबर्डी) , सुमित्राबाई पाटील ( रा . सांगवी खुर्द) , मालती भालेराव ( रा . सांगवी बु॥ ) , सुनिता भारुडे , रा . अट्रावल ) , सुंदरबाई भोई ( रा . यावल) , रईसाबी खान ( रा .यावल ) , हसीना तडवी ( रा . बोरखेडा खुर्द ) , हसनुर तडवी ( रा . मोहराळा ) , सुरेखा कोळी ( रा- यावल ) , फातमाबाई तडवी ( रा- कोरपावली ) , अपशान तडवी ( रा . कोरपावली ) , रविन्द्र सपकाळे ( रा . यावल ) या दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांचा समावेश आहे.