आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते महामार्ग दुरुस्तीच्या कामांचे भूमिपूजन

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । जुन्या बऱ्हाणपूर रोड वरून घोडसगावकडे जाणारा जुना महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

जुन्या बऱ्हाणपूर रोडवरून घोडसगावकडे जाणारा जुना महामार्ग होता. त्या महामार्गावरती बऱ्याच शेतकऱ्यांची शेती असून वर्षानुवर्षेपासून  रस्त्यावरून बऱ्यापैकी वाहतूक सुरू आहे.   या रस्त्यावर क्षतीग्रस्त पुलांमुळे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना शेतीमाल वाहतूक करताना ट्रक, ट्रॅक्टर तसेच प्रवासी व इतर वाहनाने वाहतूक करताना प्रचंड अडचण होत होती.  अतिशय जीवघेणी कसरत येथून करावी लागत असल्याने या पुलांची दुरुस्ती व्हावी ही सततची मागणी होती.  आमदार चंद्रकांत पाटील यांनी मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय कामामध्ये प्राथमिकता देऊन ही कामे मंजूर करून घेतली होती.   दोघेही पुलांच्या बांधकामाचा भूमीपूजन समारंभ आज दि. ८ मे शनिवार रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला.  यात घोडसगाव ते प्ररामा ५  मुक्ताईनगर ते कोथळी ते रामा ६  रस्ता प्रजिमा २३  किमी १ /९०० ते २/ ३०० (प्रत्यक्षात १/९००) मधील पूलाची पुनर्बांधणी करणे अंदाजीत किंमत १२५ लक्ष. व घोडसगाव ते प्ररामा ५  मुक्ताईनगर ते कोथळी ते रामा ६ रस्ता प्रजिमा २३  किमी १/९००  ते २/३०० (प्रत्यक्षात २/३००) मधील पूलाची पुनर्बांधणी करणे अंदाजीत किंमत ८० लक्ष यांचा समवेश आहे.

याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील ,शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आय. बी. शेख, शाखा अभियंता लक्ष्मीकांत सावखेडकर , शाखा अभियंता डी. एम. पाटील, सहाय्यक अभियंता सच्चिदानंद शेजवळ, दिलीप पाटील, गोपाळ सोनवणे,  सोपान दुट्टे, घोडसगाव येथील सरपंच प्रदीप कोल्हे, गोलू मुर्हे, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, कंत्राटदार उत्तम कोळी व इतरांची उपस्थिती होती.

 

Protected Content