मुंबई : नृत्तसंस्था । आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, कराचीचं नंतर बघू असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे
“मुंबईत मागील ६० वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स आहे. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. आता त्यांच नाव बदलण्यास सांगण्यात काहीच तथ्य नाही. त्यांच नाव बदलण्याची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.
कराची स्वीट्स या बेकरीचं नाव बदलण्याच्या शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केलेल्या या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी कराचीच एक दिवस भारतात असेल असं म्हटलं होत . त्यानंतर संजय राउत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कराची शिवसेनेच्या भूमिकेला टोलवत उलट “आमचा ‘अखंड भारत’वर विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की कराची एक दिवस भारताचा भाग असेल.” असं म्हटलं होतं.
. कराची पाकिस्तानातील शहर आहे त्यामुळे या शहराच्या नावानं भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होतो अस नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं.