आदिवासी संघर्ष समितीतर्फे डॉ. भांडे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

यावल, प्रतिनिधी |  येथील ग्रामीण रूग्णालयात कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

 

आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी  कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवाशी संघर्ष समितीचे प्रदेश अद्यक्ष तथा जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, वढोदा येथील  सरपंच  संदीप सोनवणे यांचे हस्ते रुग्णांना फळवाटप  करण्यात आले.  याप्रसंगी सातोद ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल सूर्यवंशी, अनील कोळी, जालंदर कोळी, भरत कोळी, गजानन कोळी, भालशिव, मोहन सपकाळे ( सरपंच पिंप्री ), यावल शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर खान, काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शहा, अमर कोळी, काँग्रेसचे यावल शहर उपाध्यक्षअनील जंजाळे, चेतन कोळी, किरण कोळी ग्रामपंचायत सदस्य,  रामभाऊ सोनवणे, मधुकर कोळी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी डॉ. बी.बी. बारेला, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके,  नानासाहेब घोडके यांच्यासह ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व आदिवासी  संघर्ष समितीचे पदाधीकारी व सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content