यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चोपडा येथील रहिवासी कल्पेश राजेंद्र पाटील यांना नुकतेच राज्य सरकारकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. त्यात सन २०२१-२२ या वर्षासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणारे मुळचे देवगाव ता.चोपडा येथील रहीवाशी व जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कुसुंबे ता.रावेर येथील उपशिक्षक कल्पेश राजेंद्र पाटील यांना सपत्नीक यांना मिळाला आहे. शिक्षण संचालक दिपक केसरकर, राज्याचे शिक्षणमंत्री मंगलसिंग लोढा व कपिल पाटील या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा हाँटेल रंगशारदा के.सी.मार्ग, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा (पश्चिम)मुंबई येथील सभागृहात शुक्रवार काल रोजी आदर्श शिक्षक पुरस्काराने संन्मान करण्यात आला. कल्पेश राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या शाळेमध्ये राबवलेले विविध उपक्रम तसेच शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी झोकून देत केलेले कार्य यांचा सन्मान यानिमित्ताने झाला आहे. व ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. कल्पेश पाटील यांना मिळालेल्या या सन्मानाने शैक्षणीक क्षेत्रासह त्यांचे मुळगाव देवगाव ता.चोपडा व परीसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. कल्पेश पाटील हे उंटावद विविध कार्येकारी सोसायटीचे सचिव संजय दिनकर महाजन यांचे जावाई आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच कुसुंबे ग्रामस्थ यांना असल्याची प्रतिक्रिया कल्पेश पाटील यांनी यावेळी दिली.