जळगाव, प्रतिनिधी । येथील आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने नुकत्याच निकाल लागलेल्या इयत्ता १० वी व १२ वी च्या माहेशवरी समाजातील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
सध्या करोना संक्रमणाच्या काळात आरोग्याची काळजी घेण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यामुळे माहेश्वरी महिला मंडळातर्फे मोजक्याच विद्यार्थ्यांचा शासकीय नियमांचे पालन करीत सत्कार झाला. यावेळी दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांचा ३ टप्प्यात सत्कार झाला. त्यांना ऑक्सिजन तपासण्यासाठी पल्स ओक्सिमीटर सत्काराच्या स्वरुपात देण्यात आले. परिसर निर्जंतुकीकरण करून विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेला क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उज्ज्वला बाहेती यांच्यासह माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष मनीषा तोतला, सचिव अमिता सोमाणी, सुवर्णा मुंदडा, शीतल मंत्री, लतिका मंत्री, भारती कोगटा, स्वाती सोमाणी, ज्योती लढा,राजश्री कोगटा, अरुणा मंत्री तसेच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.