आता भीती डुकरांपासून माणसांना होणाऱ्या कोरोनाची !

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । डुक्करांमध्ये फैलावणाऱ्या कोरोना विषाणू फैलावण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या कोरोनाची बाधा डुकरांपासून माणसांनाही होत असल्यामुळे अधिक धोका निर्माण झाला आहे

मागील १० महिन्यांपासून संपूर्ण जग हतबल झाले आहे. त्यातच आता ब्रिटन, फ्रान्स सारख्या युरोपीयन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या एकाच स्ट्रेनपासून जगाची सुटका होत नसताना आता आणखी एका कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. .

कोरोना विषाणूच्या या स्ट्रेनला स्वाइन एक्यूट डायरिया सिंड्रोम कोरोना (एसएडीएस-सीओवी) म्हणून ओळखले जाते. हा कोरोनाचा विषाणू वटवाघळांमधून आला आणि त्याची माहिती २०१६ मध्ये समोर आली होती. चीनमधील अनेक डुक्करांना याची बाधा झाली होती.

अमेरिकेतील चॅपल येथील नॉर्थ कॅरिलोना विद्यापीठाच्या संशोधकांनी या संशोधनात सहभाग घेतला होता. या संशोधनानुसार, हा विषाणू मानवाचे फुफ्फुस आणि आतड्यांच्या पेशीत वाढू शकतो. हा विषाणू बिटाकोरोना विषाणू एसएआरएस-सीओवी-२ चा भाग आहे. यामुळे मानवाला श्वसन संबंधी आजार कोविड-१९ची बाधा होऊ शकते. एसएडीएस-सीओवी हा एक अल्फाकोरोना विषाणू आहे. जो डुक्करांच्या पोटात आणि आतड्यांमध्ये आजाराचे कारण ठरतो. या विषाणूमुळे जुलाब आणि उल्टी होते.

पीएनएएस जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसाार, शास्त्रज्ञांनी एसएडीएस-सीओवीच्या संभाव्य धोक्याचे आकलन करण्यासाठी प्रयोगशाळेत परीक्षण केले होते. त्यानंतर हा विषाणू मनुष्याचे यकृत आणि आतड्यांच्या पेशींमध्ये वेगाने वाढू शकतो. डुक्करांचे मांस खाणाऱ्या देशांमध्ये हा संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे.

 

Protected Content