Home राजकीय आता जावईबापूंचाही राजकारणात होणार प्रवेश !

आता जावईबापूंचाही राजकारणात होणार प्रवेश !

0
31

नवी दिल्ली वृत्तसंस्था । प्रियंका गांधी यांच्या पाठोपाठ आता त्यांचे पती रॉबर्ट वढेरा हेदेखील राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांनी याचे सुतोवाच केले आहे.

रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुक पोस्टद्वारे राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. एकदा का आपल्यावरील आरोप-प्रत्यारोपाचे प्रकरण संपले की लोकांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आपली इच्छा आहे, असे वढेरा यांनी म्हटले आहे. इतक्या वर्षांचा अनुभव आणि शिक्षण वायाला जाणार नाही. याचा चांगल्या प्रकारे वापर केला जाईल, असे त्यांनी आपल्या सामाजिक कामांचा दाखला देताना म्हटले आहे.

अनेक वर्षे आणि महिने मी सामाजिक कामासाठी घालवले आहेत. देशातल्या विविध भागात अद्यापही काम करीत आहे. मात्र, प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील जनतेच्या जीवनात अनेक छोटे बदल घडवून आणण्याची माझी इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरुन ते युपीच्या राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound