मुंबई: राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता या आजारावरील सर्व चाचण्या वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आणि दंत महाविद्यालांमध्ये व रूग्णालयात निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
या आजाराची चाचणी करण्यासाठी खाजगी लॅबकडून ४ हजार ४०० रूपयांची आकारणी करण्यात येत होती. तर शासकिय रूग्णालयातही या चाचणीसाठी काही शुल्क आकारण्यात येत होते. कोरोना आजार हा महामारी असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे. तसेच या आजाराच्या रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही वाढती संख्या विचारात घेवून या आजाराची चाचणी आणि उपचार मोफत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींनी पुढे यावे आणि आजाराची चाचणी करून घेवून उपचार करून घ्यावेत असे आवाहन करत यामुळे आजाराचा संसर्ग वाढण्याचा धोकाही थांबेल असा विश्वास व्यक्त केला.
.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००