…आणि पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया झुकले गुरुंच्या चरणी !

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी । पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ख्यात असणारे ज्ञानेश्‍वर मुळे हे एका कार्यक्रमात आपल्या गुरूंच्या चरणी झुकल्याने उपस्थित भारावल्याचे एका कार्यक्रमात दिसून आले.

आपल्या मातीशी नाळ कायम ठेवत आकाशाला गवसणी घालणारी माणसं दुर्मिळ असतात. कितीही कठीण परिस्थिती असली तर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आकाशाला गवसणी घालता येते हे भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळे यांनी दाखवून दिलेले आहे. रशिया, जपान,अमेरिका, सीरिया, मालदीव अशा विविध देशांमध्ये राजदूत म्हणून प्रभावी काम केलेल्या ज्ञानेश्‍वर मुळेंनी प्रशासनात राहिल्यानंतर माणसं रूक्ष होतात, त्यांच्यात सर्जनशीलता राहत नाही हा समज विविध दैनिकात लेख लिहीत व प्रशासनाला नेहमी मानवी चेहरा दिलेला आहे.

एकेकाळी पासपोर्ट मिळवणे जिकरीचे होते पण विदेश सचिव पदाचा कार्यभार हाती येताच पासपोर्ट बाबतची नियमावली अतिशय सुलभ करुन भारतात जवळपास ३५० पासपोर्ट कार्यालये उभारण्यात ज्ञानेश्‍वर मुळेंचा फार मोठा हात आहे. त्यामुळेच त्यांना ङ्गपासपोर्ट मॅन ऑफ इंडियाफ या नावाने ओळखले जाते. अनेक मोठ्या जबाबदार्‍या अतिशय चांगल्या पध्दतीने पेलवणारे ज्ञानेश्‍वर मुळे यांचे पाय अजुन जमिनीवरच आहेत याचा अनुभव त्यांच्या शालेय जीवनातील गुरुंना आला. नुकतेच त्यांचे गुरुवर्य ज्योतीराम मंशू साळुंखे हयांना त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात दंडवत घालून सुखद धक्का दिला. ज्योतीराम मंशू साळुंखे हे ज्ञानेश्‍वर मुळे यांचे १९६८ ते १९७५ या काळात मुख्याध्यापक होते. त्यांनी मुळे यांना इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकवले होते. साळुंखे सरांमुळे आपले नेतृत्व गुण विकसीत झाले तसेच एक चांगला नागरीक होण्यासाठी साळुंखे सरांनी केलेले सहकार्य ज्ञानेश्‍वर मुळे यांनी जाहिररीत्या व्यक्त केले. यामुळे ज्योतीराम साळुंखे सर यांच्यासह वातावरण भारावले होते. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या या नम्रतेचे उपस्थितांनी कौतुक केले.

Add Comment

Protected Content