सिंदखेड राजा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा येथील गावठाण शिवारात ईलेक्ट्रीक डीपी गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. यासंदर्भात महिला सरपंच व उपसरंपच यांनी लेखी व तोंडी तक्रार देवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान दोन दिवसात डीपी न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा येथील गावठाण शिवारातील ईलेक्ट्रिक डीपी गेल्या दोन महिन्यांपासून बंदावस्थेत आहेत. त्यामुळे पाणी व पिठाची चकी बंद आहेत. याचा त्रास गावकरींना होत आहे. प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी देवून देखील कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान दोन दिवसात ईलेक्ट्रीक डीपी न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा आडगाव राजा गावातील सरपंच कासाबाई मानसिंग कहाळे व उपसरपंच सरिता प्रकाश सोनुने यांनी तहसीलदार सिंदखेड राजा यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून दिला आहे.
एकीकडे शहरी भागापासून आता ग्रामीण भागापर्यंत सर्व सोयीसुविधा पूर्ण करतात प्रशासन आपली प्रयत्न करत असताना तर फक्त एका गावाच्या डीपी करता गावकऱ्यांना मंत्रालय शिवाय पर्यायच दिसत नसेल तर दिव्याखाली अंधार प्रशासन सुस्त आणि अधिकारी मस्त असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.