यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव कासारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच बालविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला. या कार्यक्रमात एकूण १८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर करून त्यांच्यातील अभिनय कौशल्य व्यक्त करत गावकऱ्यांचे मने जिंकली. मुलांच्या कलागुणांना वाव देणारा असा मोठा कार्यक्रम प्रथमच पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यावल पोलिस स्टेशनचे पीआय पी. आय. धनवडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगोपाल शास्त्री महाराज हे होते. याप्रसंगी प्रमुख प्रमुख म्हणून बाबा महादेव महाराज, सरपंच मंगला कोळी, मनुदेवी ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, पोलीस पाटील प्रवीण पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे विश्वजीत पाटील, कैलास पाटील, माया पाटील, सायरा तडवी, मनीषा पाटील हे उपस्थित होते. नायब तहसीलदार माळी यांनी सदिच्छा भेट दिली. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक महाजन, दीपक प्रतीहार, सुभाष कोळी, मुलचंद पवार, प्रदीप पाटील, प्रमिला घालपे, कविता गुजर, यांनी कामकाज पाहिले.