पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी । रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता राज्यातदेखील एका मंत्रीपदाची मागणी केली आहे. येथील पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराला होणार्या विलंबाबाबत नाराजीदेखील व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री साहेब, आम्हाला एक मंत्रिपद देऊन दिलेले आश्वासन पूर्ण करा, असे आपण फडणवीसांना सांगितले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल तर आमच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद देऊन शपथविधी उरकून घ्यावा. सत्तेचा कार्यकाळ संपायला दहा महिने राहिल्याने, रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आठवलेंनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महायुती झाल्यास आरपीआयला दोन आणि शिवसेना युतीत नसेल तर चार जागा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.