जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळ्याच्या आठवडे बाजारातून बाजार करण्यासाठी आलेल्या महिलेची ५० हजार रुपयांची मंगलपोत लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, २८ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगर परिसरातील वाघोदे नगरातील कल्पना संजय पाटील वय ३० या बुधवारी बाजार करण्यााठी पिंप्राळ्याच्या बाजारात आल्या होत्या. बाजार करत असतांना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची मंगलबोत अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. प्रकार समोर आल्यानंतर कल्पना पाटील यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश् चव्हाण हे करीत आहेत.