बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निकराची लढाई किंवा झुंज.. आणि हीच झुंज रविकांत तुपकरांनी यशस्वी लढल्याचे आज दिसून आले.. हातात म्हणं घ्यायचं अन् दुपारी मोर्चाला यायचं.. या त्यांच्या सादेला हजारो शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सोयाबीनला ८ हजार ५०० रुपये आणि कापसाला १२ हजार ५०० रुपये भाव मिळालाच पाहीजे, या प्रमुख मागणीसह शेतकरीहिताच्या इतर मागण्या घेवून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात ‘वज्रमूठ’ बांधली आणि ‘एल्गार पुकारला.
हातात रूम्हणे, मुखी उद्घोषणा आणि पायात आंदोलनाची गति घेवून निघालेल्या एल्गार मोर्चाने संपूर्ण शहर गजबजले. मोर्चाला संबोधित करतांना सोयाबीन कापसाच्या उत्पादनखर्चाचा गोषवारा मांडत, शेतकऱ्यांना आंदोलनाची हाक दिली, “ज्यांनी आमच्या बापाला नागवलं. ज्यांनी आमच्या शेतकऱ्याचा घास पायाखाली तुडवला. त्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी त्यांच्या खुर्च्या ओढण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हायचे आहे..”. यावेळी तुपकरांनी सरकारला इशारा दिला की, आठवडाभरात जर सरकारने सोयाबीन कापूसबाबत निर्णय घेतला नाही तर राज्यभर आंदोलन पेटवू…मागील काही दिवसांपासून सोयाबीन कापूस प्रश्नावर तुपकरांनी गावोगावी जावून जिल्हा पिंजून काढला. त्याचा परिणाम मोर्चातील प्रचंड संख्येवरून समोर आला. आयडीबीआय बँक चौकात घाट-बाट हॉटेलजवळ उभारलेल्या मंचापासून ते जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्र रापर्यंत आणि त्याच्याही मागे कोर्ट चौकापर्यंत जनसमुदाय उपस्थित होता. महिलांची संख्याही लक्षणीय होती. चिखली रोडवरील डी. एड्. कॉलेजच्या प्रांगणातून दुपारी १२.३० वाजेदरम्यान एल्गार मोर्चा निघाला, तहसील चौक से संगम चौक आणि संगम चौक ते जयस्तंभ चौक आणि मग स्टेट बँक चौकामधून मोर्चा सभास्थळी पोहोचला. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी बारा बलुतेदार संघ, नाभिक महामंडळ तसेच इतर सामाजिक संघटनांच्या पाठीव्याने एल्गारला आणखी बळ मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेश शेळके, टी.डी. अंभोरे, पी.एम. जाधव, अँड. सुमीत सरदार, जि.प. सदस्या ज्योतीताई खेडेकर, काँग्रेसचे युवा नेते देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठाण, विजयाताई काकडे, माजी नगरसेवक उमेश अग्रवाल, शिशीर अण्णा पाटील, अनिल वर्मा इत्यादी अनेक मान्यवर ‘एल्गार’ म्हणत मोर्चात सहभागी झालेत.
मोचांचे समेत रूपांतर झाल्यानंतर प्रारंभी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते राणा चंदन यांच्या प्रतिमेला अभिवादन करून भाषणांना प्रारंभ झाला. लोककलावंत शाहीर विक्रांतसिंग राजपूत यांनी आपल्या बहारदार आवाजात एल्गार मोर्चासाठी विशेष बनविलेले ‘नकोत नुसत्या चर्चा, काढू ‘दणक्यात एल्गार मोर्चा’ गीत गावून टाळ्या मिळविल्या. प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर टाले यांनी केले. शेतकऱ्यांना न्याय मिळून देईपर्यंत विकासभाऊ स्वस्थ बसणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोणारचे सहदेव लाड, जळगांव जामोद येथील अक्षय पाटील तसेच इतर काही नेत्यांनी संक्षीप्त स्वरुपात मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. वाशिम येथील जि.प. सदस्य तसेच तुपकरांना गुरुस्थानी मानणाऱ्या दामुअण्णा इंगोले यांनी ग्रामिण वाणीतून केलेले भाषण लोकांच्या टाळ्या घेवून गेले.
एल्गार मोर्चात न जाण्यासाठी धमक्या ?
तुपकरांनी भाषणाच्या प्रारंभीच गौप्यस्फोट केला की, एल्गार मोर्चात सहभागी न होण्यासाठी जिल्ह्यातील काही नेत्यांनी गावोगावीच्या शेतकऱ्यांना फोन करून धमक्या दिल्यात. मात् रेकॉर्डिंग सुद्धा आहे, असा खळबळजनक दावाही तुपकरांनी केला. आता नाही पण वेळ आल्यानंतर हे सगळे पुरावे सादर करेल, असे सांगत तुपकर म्हणाले की, मी एक नंगाड माणूस आहे. मी बॉलसारखा आहे. जेव्हा तो आपटाल, तोता उसळल्याशिवाय राहणार नाही. पण ज्यांनी शेतकयांच्या हक्क मागणीच्या या पवित्र कामाला विरोध केला. त्याच्या ताटात शेतकरी माती कालवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.