Home धर्म-समाज आज सर्वांच्या आनंदाचा क्षण, ३० वर्षांच्या कठीण संघर्षाचे फळ मिळाले : मोहन...

आज सर्वांच्या आनंदाचा क्षण, ३० वर्षांच्या कठीण संघर्षाचे फळ मिळाले : मोहन भागवत


अयोध्या (वृत्तसंस्था) गेल्या ३० वर्षांच्या कठीण संघर्षाचे फळ आज मिळाले आहे. एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही. आज सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

 

अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. मोहन भागवत पुढे म्हणाले की, आज अनेक लोकं इथं येऊ इच्छित होते. मात्र ते येऊ शकत नाहीत. आडवाणीजी देखील हा सोहळा पाहत आहेत. आत्मनिर्भर बनण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्याची सुरुवात आज झाली आहे. या आनंदाच्या क्षणी मी सर्वांचं अभिनंदन करतो. हा आनंदाचा क्षण आहे, एक संकल्प केला होता, तो संकल्प आज पूर्ण झाला आहे, याचा आनंद आहे. इथे मंदिर बनणार आहे, मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचं निर्माण करावे लागणार आहे. देशातील सर्वांमध्ये प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराच्या उभारणीचं काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.


Protected Content

Play sound