मुंबई प्रतिनिधी । आज राज्यात कोरोना विषाणूने बाधित झालेले ४३१ नवीन रूग्ण आढळून आले असून १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज करोनाचा संसर्ग झालेल्या ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ५६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिवसभरात राज्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मृत्यूची एकूण संख्या २६९ झाली आहे.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, आज झालेल्या १८ मृत्यूंपैकी १४ पुरुष, तर ४ महिला आहेत. १८ मृत्यूंपैकी ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ५ रुग्ण होते. तर १२ रुग्णांचं वय हे ४० ते ५९ या वयोगटातलं होतं. एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. १८ पैकी १२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार आढळले आहेत. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या २६९ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००