Home क्राईम आजाराला कंटाळून प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

आजाराला कंटाळून प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भिलवाडी येथील ५१ वर्षीय प्रौढाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी की, बाळू लहू भिल, पवार (वय-५१) रा. भिलवाडी ता. जळगाव हे यांना गेल्या अनेक वर्षांपासून दुर्धर आजार जडला होता. या आजाराला कंटाळून त्यांनी आज सकाळी ६ वाजेच्या पुर्वी राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केली त्यावेळी घरात मोठा मुलगा काशिनाथ आणि मुलगी संजना घरात झोपलेले होते. त्यांची पत्नी प्रमिलाबाई व लहान मुलगा दिपक भिल हे पुणे जिल्ह्यात उसतोडणीला गेलेले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound