आजचा दिवस लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून हिंदुत्त्वाचा विजय आहे : असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे राम मंदिराच्या शिलान्यासासाठी हजर राहत पंतप्रधान मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. हा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून, हिंदुत्त्वाचा विजय आहे अशा शब्दांत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींच्या या अयोध्या भेटीवर टीका केली आहे.

 

 

एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना ओवेसी पुढे म्हणाले की, मोदींनी आज भावनिक झाल्याचे म्हटले. आज मीसुद्धा भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्वास ठेवतो. मी भावनिक झालो आहे, कारण त्या ठिकाणी जवळपास ४५० वर्षांसाठी मशिद उभी होती, असे ओवेसी म्हणाले. तसेच बाबरी मशिद पाडण्यासाठी काँग्रेसही तितकीच जबाबदार आहे, असे म्हणत या धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर आधारलेल्या पक्षांचा खरा चेहरा समोर आल्याची टीका देखील ओवेसी यांनी काँग्रेसवरही टीका केली.

Protected Content